24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रआर्थर रोड तुरुंगात बनविले ९ व्हीव्हीआयपी बॅरेक

आर्थर रोड तुरुंगात बनविले ९ व्हीव्हीआयपी बॅरेक

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यासह अनिल देशमुख आणि नवाब मलिक या तीन व्हीव्हीआयपी कैद्यांना इतर काही व्हीव्हीआयपी आरोपींची साथ लवकरच आर्थर रोड तुरुंगात मिळणार आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचे कारण म्हणजे आर्थर रोड तुरुंगात नवीन ९ व्हीव्हीआयपी बॅरेक बनविण्यात आले आहेत. आत हे बॅरेक कोणत्या व्हीआयपीसाठी असतील हे येणार काळच कळणार आहे. मात्र असं असलं तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच काही मोठी नावं असलेले व्यक्ती आर्थर रोड तुरुंगात येणार आहेत, त्यासाठीच ही तयारी असल्याच सांगितले जात आहे.

हजारों कोटींचा घोटाळा करून परदेशात फरार झालेले विजय माल्ल्या आणि निरव मोदी या ९ बॅरेकचा भविष्यात वापर करू शकतात, कारण दोघांनाही भारतात आणून त्यांच्याविरुद्ध लवकरात लवकर खटला चालवण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहेत. नीरव मोदी आणि माल्ल्या या दोघांनाही भारताकडे प्रत्यार्पण केल्यास आर्थर रोड तुरुंगाच्या १२ क्रमांकाच्या बॅरेकमध्ये ठेवण्याचा प्रस्ताव होता. या बॅरेकची रेकी, त्याचा व्हीडीओ यूके न्यायालयात सादर ही करण्यात आला होता. पण आता तयार झालेल्या या नवीन बॅरेकचे नवीन पाहूणे हे दोघे असतील.

येणारी व्यक्ती व्हीव्हीआयपी?
माल्ल्या आणि निरव मोदी यांच्या व्यतिरिक्त इतर बॅरेकमध्ये भविष्यात कोण येतील या बद्दल आता कुणीच काही सांगू शकत नाही. पण येणारी व्यक्ती व्हीआयपी असेल हे निश्चित आहे. राजकीय वर्तुळात या घडीला ईडीच्या रडारवर आता कोण येईल याची सतत चर्चा असते. म्हणून भविष्यात इथे येणारी व्यक्ती ही राजकीय असल्याचेही बोलले जात आहे.

कसे आहेत हे नवीन ९ बॅरेक?
– हे नवीन ९ बॅरेक ग्राउंड प्लस वन या स्ट्रक्चरचे आहेत. या बॅरेकमध्ये जवळपास ८ सेल आहेत.
– तेथे संलग्न स्रानगृहे आहेत आणि कैद्यांना मेलामाईन क्रॉकरीसह गादी, उशी आणि बेडशीट पुरवले जाते. या सोबत या बॅरेकमध्ये पंखा व टीव्ही सेट ही असतो.
– हे बॅरेक तुरुंगाच्या इतर भागांपेक्षा वेगळे आसतात, जिथे गर्दी नसते.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या