23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रराजभवनावर फडकणार १५० फुटांचा तिरंगा ध्वज

राजभवनावर फडकणार १५० फुटांचा तिरंगा ध्वज

एकमत ऑनलाईन

मुंबई : राजभवन येथे १५० फुटांवर आणि १५ फुटांवर असे दोन प्रकारचे झेंडे आहेत. एरव्ही वादळी वा-यांपासून बचावासाठी म्हणून १५० फुटांचा झेंडा हा जून ते ऑक्टोबर या कालावधीत लावण्यात येत नाही. परंतु यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पहिल्यांदा या कालावधीत हा झेंडा लावण्यात येणार आहे. राजभवन येथे २०१६ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या शिलालेखाचे अनावरण करण्यात आले होते. त्याचवेळी या १५० फुटांच्या झेंड्याचीही उभारणी करण्यात आली होती.

एरव्ही मॉन्सूनच्या कालावधीत हा झेंडा वर चढवताना फाटतो. त्यामुळे पावसाळ््यात झेंड्याला नुकसान होऊ नये, म्हणून याठिकाणी ५ महिन्यांच्या कालावधीत झेंडा फडकवण्यात येत नाही. राज्यपालांचे पावसाळ््यातील निवासस्थान हे पुणे असते. त्यामुळे पुण्यात राज्यपालांच्या उपस्थितीत झेंडा फडकवण्यात येतो. एरव्ही पावसाळा वगळता कालावधी पाहता याठिकाणी १५० फुटांचा झेंडा फडकवण्यासाठी १० ते १२ पोलिसांची तसेच स्थानिकांची मदत घेऊन हा झेंडा फडकवण्यात येतो. हा झेंडा दर तीन महिन्यांनी फडकवण्याच्या आणि उतरवण्याची राजभवनातील शिस्तीचा पायंडा आहे, तर दुसरा १५० फुटांच्या फ्लॅग पोस्टच्या ठिकाणी एसआरपीएफचे तीन जवान सकाळी झेंडा फडकवणे आणि सायंकाळच्या सुमारास झेंडा उतरवणे हे काम नित्यनियमाने करतात.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या