बेळगाव : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (शिवसेना) खासदार संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे.
या जामिनामुळे राऊतांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद चिघळला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांवर बेळगाव जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
त्यातच महाराष्ट्रातील नेत्यांकडून वारंवार सीमेबाबत वक्तव्य होत असल्यामुळे त्यांना कर्नाटक शासनामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.