26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमालट्रकची कारला धडक, तिघे ठार

मालट्रकची कारला धडक, तिघे ठार

एकमत ऑनलाईन

नगर : नगर-सोलापूर मार्गावर सोमवारी दुपारी भीषण अपघात झाला. मांदळी गावाजवळ मालट्रक आणि कार यांची समोरासमोर धडक होऊन ही दुर्घटना घडली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला आणि आत बसलेले तीन तरुण बाहेर फेकले गेले. त्यामुळे तिघांचाही मृत्यू झाला आहे.

नगर-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. तसेच मांदळी गावाच्या शिवारात पुलाचे काम सुरू आहे. तेथे हा अपघात झाला. यामध्ये शरद शोभाचंद पिसाळ (३२), निळकंठ रावसाहेब माने (३४) व धर्मराज लिंबाजी सकट (२७ तिघे रा. थेरगाव, ता. कर्जत) यांचा मृत्यू झाला. आणखी एक जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हे तरुण मिरजगावकडून मांदळीकडे कारमधून (एमएच ०४ डीएन ३३४१) निघाले होते. त्यावेळी समोरून येणा-या मालट्रकने (टीएन २८ एएम ३३४२) ने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. ट्रकची ठोकर बसल्यानंतर कार बाजूला जाऊन पुन्हा दुभाजकावर आदळली. ही धÞडक एवढी जोरदार होती की कारचे इंजिनही निखळले. खिळखिळ््या झालेल्या कारमध्ये बसलेले तरुणही बाहेर फेकले गेले. यामध्ये माने आणि पिसाळ दोघे जागीच ठार झाले, तर धर्मराज सकट याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मिरजगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे घटनास्थळी दाखल झाले. थेरगावचे सरपंच रविंद्र महारणवर, मांदळीचे उपसरपंच धनेश गांगर्डे, नागमठाणचे सरपंच देविदास महारणवर, शोभचंद शिंदे, उपसरपंच रामा शिंदे, सुधीर बचाटे, स्वप्नील शहाणे, परशुराम बावडकर, पोलीस पाटील ईश्वर जोगदंड यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी येऊन मदतकार्य केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या