25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रफडणवीस यांना चिडवणा-यांवर गुन्हा दाखल

फडणवीस यांना चिडवणा-यांवर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

नाशिक : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नाशिक येथील कोविड रुग्णालयात पाहणीसाठी गेले असताना काही जणांनी अश्लाघ्य भाषेत त्यांच्यावर टिप्पणी करत व्हीडीओ बनवला होता. हा व्हीडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ३० एप्रिलला नाशिक महानगरपालिकेच्या बिटको कोविड रुग्णालयाला भेट देऊन तेथील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गिरीश महाजन देखील होते.

देवेंद्र फडणवीस बिटको रुग्णालयात प्रवेश करत असताना काहीजण त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत होते. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी याचा व्हीडीओ देखील बनवला. फडणवीस हे आढावा घेत असताना काही व्यक्ती व्हीडीओ काढून देवेंद्र फडवणीस यांना चिडवत होते हे या व्हीडीओच्या चित्रीकरणात दिसतंय. व्हीडीओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवराळ टिप्पणी करण्यात आलीय. दरम्यान पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन २ दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईच्या मृतदेहाजवळ दोन दिवस बाळ उपाशीपोटी; महिला पोलिसांनी दाखवली माणुसकी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या