23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रदुसर्‍यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार : दिपाली सय्यद

दुसर्‍यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार : दिपाली सय्यद

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात मविआ सरकार पडल्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. यांनंतर दुसऱ्यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार म्हणत शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार, बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यासह अनेक नेत्यांनी त्यांनी मुख्यमंत्री राहिल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून काम कराव लागते असल्याच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली आहे.

शरद पवार यांनी तर त्यांच्या चेहर्‍यावरून ते नाराज असल्याचे दिसत असल्याचे म्हटले होते. त्यांनंतर राज ठाकरे यांनी यांनी वेगळी भूमिका घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या फडणवीस यांचे कौतुक केले आहे.

दिपाली सय्यद यांनी ट्विट करत मनसे अध्यक्षांना सवाल केला आहे की, दुसऱ्यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार माननीय राजसाहेब कधीतरी १ आमदारावरून तुमचा धनुष्यबाण २ आमदारावर पोहचवुन जनतेला दाखवुन द्या कि कर्तृत्व नक्की काय असते, नाहीतर सारखी दोरी मागे ओढावी लागते हे बरे नव्हे, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या