29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात दोन दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन?

राज्यात दोन दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन?

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट एवढी भयंकर असेल, असे आम्हाला वाटले नव्हते. दुसरी लाट सौम्य स्वरुपाची असेल असे तज्ज्ञाचे मत होते. मात्र राज्यातील कोरोनाचे वाढते प्रमाण बघता आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे माहिती पोहचविली असून, येत्या दोन दिवसांत राज्यात संपूर्ण लॉकडाऊन अंमलात आणण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे निर्णय घेणार असल्याची माहिती सोमवार दि़ १९ एप्रिल रोजी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली़

सध्या लॉकडाऊनचे नियोजन ३० एप्रिलपर्यंत आहे. पण पुढे ही वाढले तर तसे नियोजन केले जाईल, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. कोविड रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर आहे. केंद्र सरकारकडून यावर्षी कोविडसाठी अजून पैसे आलेले नाहीत. १६०० कोटी रुपये अपेक्षित आहेत. पुढच्या काही दिवसात ते पैसे येतील. अनेक जिल्ह्यातून जम्बो रुग्णालयांची मागणी येत आहे़ त्यासाठी ७५ टक्के निधी केंद्र आणि २५ टक्के निधी राज्य देईल. ५५०० कोटी रुपये कोविडसाठी राखीव ठेवले आहेत, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. दिल्लीने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्याची माहिती आम्ही घेत आहोत. तिथेही लोकल सेवा आहे, ते कशा पद्धतीने नियोजन करत आहेत त्यावर चर्चा करू,असे वडेट्टीवार म्हणाले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी केली. पण त्याचा फायदा पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

संपूर्ण लॉकडाऊन जनतेची मागणी
आपण सध्या संचारबंदी केली आहे. लॉकडाऊन म्हणजे पूर्ण बंद काहीच मिळणार नाही. लॉकडाऊनला काही व्यापा-यांचा विरोध होता. आता लॉकडाऊन शंभर टक्के करा, अशी लोकचे मागणी करत आहेत़ व्यापा-यांची सुद्धा मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत याची माहिती पोहोचवली आहे. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री लॉकडाऊनसंबंधी निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

लॉकडाऊनचा निर्णय राज्­याने घ्यावा : अमित शाह
तीन महिन्­यांपूर्वीच केंद्र सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेण्­याबाबतचे सर्व अधिकार राज्­य सरकारला दिले आहेत. ज्­या राज्­यांमध्­ये रुग्­णसंख्­या झपाट्याने वाढत आहे. येथील राज्­य सरकारने लॉकडाउनबाबत निर्णय घ्­यावा, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्­पष्­ट केले आहे. लॉकडाऊनसारखे उपायांबाबत निर्णय घेता यावा, यासाठी तीन महिन्­यांपूर्वीच राज्­य सरकारांना अधिकार देण्­यात आले आहेत.

देशात पून्हा लॉकडाऊनची शक्यता फेटाळली
दरम्यान संपूर्ण देशात लॉकडाउन लागू केले जाईल, ही शक्­यता त्­यांनी पुन्हा एकदा फेटाळून लावली. गेल्­या वर्षी लॉकडाउनमध्­ये केंद्र सरकारने कोरोनाशी लढा देण्­यासाठी मुलभूत सुविधा उभारल्­या आहेत. मागील वर्षी कोरोना संसर्गाचे संकट वेगळे होते. त्­यावेळी या विषाणूविरोधातील उपचारांची प्राथमिक माहितीही नव्­हती. तसेच लसही उपलब्­ध नव्­हती. मात्र एक वर्षानंतर परिस्­थिती बदलली आहे. आता कोरोना प्रतिबंधासाठी लस आहे. तसेच कोरानावरील उपचारासाठींच्­या सुविधांमध्­येही वाढ झाली आहे.

परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राजकारण : चंद्रकांत पाटील
महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती आता सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊनचा आता सोपा मार्ग निवडला आहे. व्यवस्था काहीच करायची नाही आणि केंद्र सरकारकडे सगळे ढकलायचे अशा पद्धतीचे राजकारण सुरू असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, खरेतर या परिस्थितीत राजकारण करणे चुकीचे असून, सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.

माजी पंतप्रधानांचा लसीकरणाचा सल्ला काँग्रेस नेत्यांनी ऐकावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या