23.5 C
Latur
Wednesday, March 29, 2023
Homeमहाराष्ट्रमोकाट जनावरांच्या मालकाला दीड ते पाच हजारांचा दंड

मोकाट जनावरांच्या मालकाला दीड ते पाच हजारांचा दंड

एकमत ऑनलाईन

-कारावासाची शिक्षा मात्र रद्द

मुंबई : ग्रामीण भागात बाजारपेठा, रस्त्यावर फिरणा-या मोकाट गुरांना आळा घालण्यासाठी दंडाची रक्कम पाच पट वाढवणारे विधेयक मंगळवारी विधानसभेत समंत करण्यात आले. मात्र पूर्वीची एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा आता रद्द करण्यात आली आहे.

अनेक गावांमध्ये जनावरांचे मालक आपली गुरे दिवसभर रस्त्यावर सोडून देतात. ही गुरे चा-यासाठी बाजारपेठा, रस्त्यांवर फिरत असतात. यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. वाहनचालकांना त्याचा त्रास होतो. गोवंश हत्याबंदीनंतर तर हा प्रश्न आणखीनच गंभीर झाला आहे. मोकाट जनावरांना आळा घालण्यासाठी पूर्वी कायदा करण्यात आला. मात्र या कायद्यात कारावासाची मोकाट गुरे आढळल्यास मालकाला ३०० रुपये दंड आणि एक महिन्याचा कारावास अशा शिक्षेची तरतुद होती. यात बदल करण्याचे विधेयक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत मांडले. यापुढे कारावासाची तरतूद नसेल. पण दंडाची रक्कम पाच पटीने वाढवण्यात आली आहे.

पूर्वी मोकाट जनावरांच्या मालकाला ३०० रुपये दंड व एक महिन्याचा कारावासाची शिक्षा होती. आता कारावासची तरतुद रद्द करण्यात आली आहे. मात्र दांची रक्कम पहिल्या अपराधासाठी दीड हजार रुपये,व त्यापुढील प्रत्येक अपराधांसाठी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या