22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रऑटोरिक्षाच्या मागच्या सीटवर आढळला पाच फुटांचा अजगर!

ऑटोरिक्षाच्या मागच्या सीटवर आढळला पाच फुटांचा अजगर!

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या सोशल मीडियावर अंगावर काटा आणणारा एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. एका ऑटोरिक्षाच्या मागच्या सीटवर चक्क पाच फुटांचा अजगर आढळून आल्याचा हा व्हीडीओ आहे. हा व्हीडीओ महाराष्ट्रातील टिटवाळा परिसरातील आहे.

ऑटोमध्ये अचानक अजगर बघितल्यानंतर ऑटोचालकही चांगलाच घाबरला. त्यानंतर सर्पमित्राच्या मदतीने या अजगराला बाहेर काढण्यात आले.

सध्या सोशल मीडियावर या व्हीडीओची बरीच चर्चा रंगली आहे. नेटकरीही या व्हीडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. सध्या पावसाळ्याच्या काळात अनेकजण फिरायला आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडतात. अशावेळी ऑटो, बसमध्ये इतर कोणत्याही ठिकाणी वावरताना सावध राहणे गरजेचे आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या