22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रस्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हात-पाय बघत नाही

स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हात-पाय बघत नाही

एकमत ऑनलाईन

जळगाव : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत मिळून बंड केल्यानंतर चर्चेत आलेले आणि आता नव्या सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जळगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

मंत्री पाटील म्हणाले की, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ. स्त्री रोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही. हात-पाय बघणारा कधीच स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही. आम्ही जनरल फिजीशियन आहोत. आमच्याकडे ज्याची बायको नांदत नाही, तो पण येतो. आमचे एकटे डोक असतो. डॉक्टरांचे एकाच फॅकल्टीचे डोक असते. आमच्याकडे वेगळवेगळ्या समस्या असतात. आम्ही समजून घेऊन काम करत असतो असेही पाटील यांनी म्हटले.
गुलाबराव पाटील हे आपल्या दमदार भाषणांसाठी ओळखले जातात. मात्र आज जाहीर कार्यक्रमात त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरवर विधान केले. त्यामुळे यावर आता विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या