22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रअंधेरीत सिनेमाच्या सेटला भीषण आग

अंधेरीत सिनेमाच्या सेटला भीषण आग

एकमत ऑनलाईन

मुंबई : अंधेरी येथे भीषण आग लागल्याचे वृत्त समोर आले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ ते १० गाड्या दाखल झाल्या आहेत. चित्रकूट मैदानावरील चित्रपटाच्या सेटला ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये कुणी अडकले आहेत का? याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मुंबई आपत्ती विभागाकडून ही आग लेव्हल २ ची असल्याचे सांगण्यात आले असून, चित्रकूट मैदानावर तात्पूरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सिनेमाच्या सेटला ही आग लागली यामध्ये तेथील सर्व सामान जळून खाक झाले आहे. आतापर्यंत या घटनेत कोणतीही जिवीत अथवा मनुष्य हानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. चित्रकूट मैदानावर अनेक चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी छोटे- छोटे सेट उभारण्यात येतात. त्यातीलच एका सेटला ही आग लागली आहे.

अंधेरीतील डीएनए नगरमधील चित्रकूट मैदानावर एका चित्रपटाच्या सेटला ही आग लागली आहे. या आगीव नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू असून, आगीचे लोटच्या लोट आकाशात परसरलेले दिसून येत आहेत. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या