मुंबई : भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या येथील निवासस्थानाजवळ गुरूवारी स्फोटकांनी भरलेली जीप आढळली. त्या घटनेमुळे एकच सनसनाटी निर्माण होऊन सुरक्षा आणि तपास यंत्रणांची धांदल उडाली. मुंबईतील पॉश एरियात अंबानी यांचे अँटिलिया नावाचे बहुमजली भव्य निवासस्थान आहे. अतिसुरक्षित असणा-या त्या निवासस्थानापासून काही अंतरावर संशयास्पद स्कॉर्पियो जीप आढळली. त्या जीपसंदर्भात दुपारच्या सुमारास एक फोन आल्याने मुंबई पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानंतर बॉम्बशोधक आणि श्वानपथकांनाही पाचारण करण्यात आले. जीपमध्ये जिलेटीनच्या २५ कांड्या आढळल्या, असे वृत्त काही वाहिन्यांनी दिले.
जीपमध्ये जिलेटीन कांड्यांसह एक चिठ्ठीही सापडली. त्यामध्ये घातपात घडवण्याची धमकी देण्यात आल्याचे समजते. मात्र, त्याचा तपशील समजू शकला नाही. संबंधित प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांच्या फुटेजची छाननी केली जात आहे. स्फोटके ठेवण्यात आलेली जीप बुधवारची मध्यरात्र उलटल्यानंतर संबंधित ठिकाणी पार्क करण्यात आली. त्या जीपचा क्रमांक बनावट असल्याचे समजते. अंबानी यांच्या एका वाहनाचा आणि त्या जीपचा क्रमांक सारखाच आहे. त्यामुळे सस्पेन्स आणखीच वाढला आहे. संबंधित घटनेची गंभीर दखल सुरक्षा आणि तपास यंत्रणांनी घेतली आहे.
मुंबईत सापडलेल्या स्फोटकांविषयी एटीएसचा मोठा खुलासा
मुंबईच्या पेडर रोड परिसरात एका रस्त्यावर उभ्या केलेल्या गाडीत जिलेटिनच्या २० कांड्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही बेवारस गाडी या परिसरात तब्बल १८ तास उभी होती, असे आता स्पष्ट झाले आहे. मुंबईच्या या हाय प्रोफाइल भागात अनेक प्रतिष्ठितांचे बंगले, राजकीय व्यक्तींची ये-ज, दूतावास कार्यालयं आहेत आणि तिथेच स्फोटकांची गाडी सापडल्याने अधिकच चिंतेचा विषय आहे. याबाबतचा तपास करायला महाराष्ट्र दहशतवाद निर्मूलन पथकाचे (एटीएस) लोक घटनास्थळी पोहोचले होते. आता एटीएसच्या उच्चपदस्थ सूत्रांकडून स्फोटकांबाबत मोठी माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रातल्या तपासयंत्रणांच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या या सुट्या होत्या. बाँबस्फोट घडवण्यासाठी त्या एकत्र बांधून असेम्बल कराव्या लागतात. मुंबईत सापडलेली स्फोटके असेम्बल्ड नव्हती, असं तपास यंत्रणांनी सांगितले. आम्ही या प्रकरणी सर्व दिशांनी तपास करत आहोत. पण स्फोटकांची अवस्था पाहता त्यातून बाँबस्फोट घडवायच्या उद्देशापेक्षा दहशत पसरवण्याचा उद्देश असावा, असे वाटते. देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी याचा काही संबंध नाही ना हेसुद्धा तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले़
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हा परिसर हाय सिक्युरिटी झोनमध्ये येतो. ही स्फोटके इथे ठेवणा-या व्यक्तीला किंवा संघटनेला याची निश्चित जाणीव असावी. त्यामुळे मुद्दामच भीता किंवा दहशत पसरवण्यासाठी ही स्फोटकांची गाडी इथे ठेवण्यात आली असावी, असे प्रथमदर्शनी वाटते. बाँबस्फोट घटवण्यापेक्षा त्याची भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही गाडी कारमायकल रोडवर लावण्यात आली असावी, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे.
ही गाडी रस्त्यावर ठेवण्यापूर्वी कुणी इथे येऊ परिसराची रेकी केली होती का, याचाही पोलिस तपास करत आहेत.
उउळश् मध्ये काय दिसलं?
हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या कांड्या आढळल्या. रात्री 1 वाजताच कुणीतरी ही गाडी इथे लावून पसार झालं होतं. परिसरातल्या उउळश् चं फूटेज आणि गाडीची नंबर प्लेट यावरून तपास यंत्रणांचा प्रवास सुरू झाला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एकच्या सुमारास या मायकल रोडवर हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी पार्क करण्यात आली होती. गाडी पार्क केल्यानंतर गाडीतील व्यक्ती खाली उतरून मागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या गाडीतून बसून निघून जातो, असं उउळश् मध्ये दिसलं आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांनी जारी केल आहे.