22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रएमएमआरडीएच्या विकासकामांसाठी ६० हजार कोटींचे कर्ज उभारणार

एमएमआरडीएच्या विकासकामांसाठी ६० हजार कोटींचे कर्ज उभारणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : एमएमआरडीएच्या अनेक प्रकल्प कामांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन विकासकामांसाठी ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.

राज्य मंत्रिमंडळाची तिसरी बैठक आज पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, एमएमआरडीएचे अनेक प्रोजेक्ट आहेत. त्यांना ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज हवे आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील १२ हजार कोटी रुपयांची सरकारने हमी दिली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले

. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या या घोषणेमुळे मुंबई आणि परिसरातील मेट्रो प्रकल्पासह इतर महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागण्यास वेग मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या