मुंबई : राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपा खासदार रामदास तडस बिनविरोध निवडून आले आहेत. येत्या ३१ जुलै रोजी नागपुरात कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.
काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. या अगोदर ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष होते.