कल्याण : राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, राजीनामा देताना त्यांनी प्रकृतीचे कारण दिले आहे.
जगन्नाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू नेते म्हणून ओळखले जायचे.