34.3 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानाला भीषण आग

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानाला भीषण आग

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानाला भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या घटनास्थळी आठ गाड्या पोहोचल्या आहेत. सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली असून सध्या अग्निशमन दलाच्या जवानांचे युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे.

आज सकाळी साडे अकराच्या सुमारास क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानात भीषण आग लागली. या आगीच कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉक सर्किटमुळे लागली असल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार अब्दुल रेहमान स्ट्रीटवरील दुकानाला आग लागली आहे. सध्या अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी काम सुरू आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर येत आहे.

जून महिन्यात ब्रिटीशकालीन या बाजारात लेव्हल दोनची आग लागली होती. मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणांपैकी क्रॉफर्ड मार्केट हे ठिकाण आहे. इथे अनेक छोटी-मोठी दुकाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सपासून हाकेच्या अंतरावर क्रॉफर्ड मार्केट आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या