23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीत एक साम्य : फडणवीस

उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीत एक साम्य : फडणवीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपात चांगलीच जुंपली आहे. फक्त नेतेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांवरही टीका केली जात आहे. नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना त्यांच्या गाण्यावरून टोला लगावला होता. यावरच देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल शैलीत उत्तर दिले आहे.

राज्यातल्या विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी आपली पत्नी आणि उद्धव ठाकरेंमध्ये साम्य असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अमृता फडणवीसांना लगावलेल्या टोल्याबद्दल भाष्य केले आहे.

फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीवर उत्तर दणे सोडत नाही. मला असं वाटतं की उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवली पाहिजे. आणि असं काही आलं तर माझ्या पत्नीनीही त्याला उत्तर द्यायला नको, असे माझे मत आहे. अर्थात तो त्या दोघांचा प्रश्न आहे, त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाउत्सव कार्यक्रमात बोलताना नाव न घेता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना टोला लगावला होता. त्यालाच आज अमृता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मला वाटले होते, अब्जाधीश फक्तं आपणच आहात. आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा आब्जाधीशच आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या