28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeमहाराष्ट्रमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 29 टन डांबर घेऊन जाणाऱ्या टँकरला मोठा अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 29 टन डांबर घेऊन जाणाऱ्या टँकरला मोठा अपघात

एकमत ऑनलाईन

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा पहा व्हिडिओ

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर किवळे एक्झिट येथे मुंबईहून पुण्याकडे डांबराची वाहतूक करणारा टँकर उलटला. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात डांबर पसरले असल्याने इतर वाहनांचा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे भरधाव वेगात असलेला टँकर उलटला

मुंबई येथून सांगली येथील प्लांटवर 29 टन डांबराची वाहतूक करणाऱ्या टँकर रवाना झाला होता. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर 94 किलोमीटरवर किवळे एक्झिट इथं पोहोचला असता अचानक एका भरधाव वाहनाने ओव्हरटेक केल्याने टँकरवरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे भरधाव वेगात असलेला टँकर उलटला. हा अपघात सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास झाला. सुदैवाने या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून क्लीनरला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

 

Read More  धाकधूक वाढली : बारावीचा निकाल २० जुलै २०२० पर्यंत जाहीर करण्यात येणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या