मुंबई : मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये भीषण आग लागली आहे. फिल्म सिटीमधील टीव्ही मालिकेच्या सेटवर आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीतून काही कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर काही कलाकार सेटवर अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. गुम है किसी के प्यार मे या मालिकेच्या सेटला ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या पोहोचल्या होत्या.
दादासाहेब फाळके चित्रनगरीतील गुम है किसी के प्यार मैं या मालिकेच्या सेटला भीषण आग लागली आहे. काही कलाकार या आगीत अडकले असून काहींना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कलाकार, तंत्रज्ञ यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुम है किसी के प्यार मैं या मालिकेचे शूटिंग सुरू होत असताना १० मार्चला सायंकाळी चारच्या सुमारात आग लागल्याची माहिती समोर आली आहे.