24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रवाघाची कातडी ओढून वाघ होता येत नाही

वाघाची कातडी ओढून वाघ होता येत नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विशेष करून कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांचा मोठा विजय झाला. या विजयावरून आता संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि विशेष करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वाघाची कातडी ओढून वाघ होता येत नाही, अशी खरमरीत टीका संभाजीराजे छत्रपतींनी तुकोबांच्या अभंगाच्या ओळी ट्विट करत शिवसेनेवर केली आहे.

वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ।।
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय।।,
असे संभाजीराजेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या ट्विटचा रोख हा शिवसेनेकडे आहे. त्यांनी या ट्विटमधून शिवसेनेचा उल्लेख टाळत सेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीही संभाजीराजे छत्रपतींनी एक ट्विट केले होते. कोल्हापूरचाच खासदार होणार, याचा मला आनंद आहे, असे त्यांनी काल रात्री केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणा केली होती. तर शिवसेनेने त्यांना उमेदवारीसाठी शिवबंधनाची म्हणजेच शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. पण संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम राहिले. यामुळे शिवसेनेने कोल्हापूरमधील पक्षाचे नेते संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली होती. तसेच शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींवरही निशाणा साधला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या