मुंबई : जर एखादी महिला सुशिक्षित असेल तर तिला कामासाठी घराबाहेर जाण्याची सक्ती किंवा जबरदस्ती करता येणार नाही. एखादी महिला पदवीधर आहे याचा अर्थ तिला नोकरी करावीच लागेल असं नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणी प्रसंगी म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी म्हटलें, घरातील स्त्रीने आर्थिक योगदान दिले पाहिजे हे आमच्या समाजाने अद्याप मान्य केले नाही.
काम करणे ही महिलेची आवड आहे. मात्र, तिला कामावर जाण्यासाठी भाग पाडले जाऊ शकत नाही. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात एका पुरुषाच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च पत्नीला उदरनिर्वाहासाठी पैसे देण्याचे निर्देश दिले. पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणा-या एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठात सुनावणी सुरू आहे.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, न्यायालयाने म्हटले, एखादी महिला पात्र असेल आणि तिच्याकडे शैक्षणिक पदवी असली तरीही तिला काम करण्याचा किंवा घरी राहण्याचा पर्याय आहे.