18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रपुण्यात जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारणार

पुण्यात जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय पुणे येथे उभारण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पुणे यथील साखर संकुलातील जागेत साखर संग्रहालय उभारण्यात येईल. साखर संग्रहालयास प्रशासकीय मान्यता देणे, संग्रहालयाचे डिझाईन अंतिम करणे, निधी उपलब्ध करुन देणे, संग्रहालयाच्या बांधकाम विषयक कामकाजाचा आढावा घेणे यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक समिती, सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली साखर संग्रहालयाच्या प्रत्यक्ष उभारणी कामकाजावर देखरेखीसाठी कार्यकारी समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.

साखर संग्रहालय उभारणीसाठी अंदाजे रु. ४० कोटीपर्यंत खर्च अपेक्षित असून त्यासाठी शासनाने साखर आयुक्तांना तीन वर्षात सदर निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली. साखर संग्रहालयाच्या उभारणीबाबतचे आरेखन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतून निवड करण्यात येईल.

२ साखर कारखान्यांच्या थकहमी
मुंबई : गाळप हंगाम २०२१-२२ करिता राज्यातील २ सहकारी साखर कारखान्यांच्या २८ कोटी रुपये इतक्या अल्पमुदत कर्जास शासन थकहमी देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राजगड सहकारी साखर कारखाना लि.,ता.भोर, जि. पुणे व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि. चंद्रभागानगर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर या २ सहकारी साखर कारखान्यांना अनुक्रमे रक्कम १० कोटी रुपये व १८ कोटी रुपये अशा २८ कोटी रुपये अल्पमुदत कर्जास थकहमी देण्यात येईल. यासाठी यापूर्वी निश्चित केलेले शासनाच्या हमीपोटी प्रतिक्विंटल साखर उत्पादनावर २५० रुपये हे स्वतंत्र टॅगिंग हमीवरील कर्जाची व्याजासह एक वर्षाच्या आत पूर्ण परतफेड करण्यात यावी. शासनाने हमीबाबत निर्गमित केलेल्या निर्णयाचे लाभधारक/कर्जदार साखर कारखान्यांकडून अटी व शर्तीची पूर्तता करून बँकेकडून ऑक्टोबर २०२१ पूर्वी रक्कम वितरित न झाल्यास त्यानंतर वितरित होणा-या कर्जास शासन हमी कोणत्याही परिस्थितीत लागू राहणार नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या