26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिक जिल्ह्यात घरपोच लसीकरणाला वेग

नाशिक जिल्ह्यात घरपोच लसीकरणाला वेग

एकमत ऑनलाईन

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी लसीकरण मात्र सुरूच आहे. आता ‘हर घर दस्तक’ या मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास दीड लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती निवळली असली तरी लसीकरण मात्र अद्यापही सुरू आहे. कोरोनासोबत पावसाळ्यात येणा-या जलजन्य आजारांचे आव्हान महापालिकेसमोर असून ‘हर घर दस्तक’ सारख्या अभियानातून सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना महाराष्ट्र कोविड टास फोर्सने केली आहे.

तसेच प्रत्येक नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून मास्कचा नियमित वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तर ज्या नागरिकांनी अद्याप एकही डोस घेतला नाही किंवा कोणताही दुसरा डोस राहिला असेल त्यांनाही घरी जाऊन लस देण्याच्या सूचना नुकत्याच देण्यात आल्या आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीकरणाला वेग आला आहे. कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी पुढील दोन आठवडे कोरोना परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी बाधित रुग्ण शोधून काढणे हे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवली जात आहे. त्याप्रमाणे ‘हर घर दस्तक’च्या माध्यमातून लसीकरणाचा वेग वाढविण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या