25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रसचिन वाझेला सेवेतून काढण्याच्या प्रक्रियेला वेग

सचिन वाझेला सेवेतून काढण्याच्या प्रक्रियेला वेग

एकमत ऑनलाईन

मुंबई : अ‍ँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी अटकेत असलेले निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेला आता पोलिस सेवेतून काढण्याची प्रक्रिया मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. सचिन वाझेविरोधात भादंवि १९४९ च्या कलम ३११ अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. मुकेश अंबानी यांच्या अ‍ँटिला या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओत सापडलेल्या स्फोटक प्रकरणात एनआयएने सचिन वाझेंना अटक केल्यानंतर ही प्रक्रियेच्या हालचालींना मुंबई पोलिसांकडून वेग आला आहे. सचिन वाझेंची शेवटची पोस्टिंग विशेष शाखेत झाली होती. त्यामुळे ही प्रक्रिया संबंधित विभागाची जबाबदारी असल्याची मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच विशेष शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांनी महाराष्ट्र एटीएस आणि एनआयएला पत्र लिहून सचिन वाझेंच्या या प्रकरणातील समावेशासंबंधित कागदपत्रांची मागणी केली होती, ज्याचे एफआयआर कॉपीचाही उल्लेख होता. हे कागदपत्र सोमवारीच विशेष शाखेला सोपविण्यात आले आहेत. नंतर विशेष शाखेचे अधिकारी यावर आपला अहवाल बनवून राज्य सरकारला सोपवेल आणि वाझेंवर भादंवि १९४९ च्या कलम ३११ अंतर्गत कारवाई करण्याची परवानगी मागतील. मुंबई पोलिसांतील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, आम्हाला एटीएस आणि एनआयएकडून अहवाल मिळाला आहे. जो आम्ही आता लिगल सेलला पाठवू आणि पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. जर सचिन वाझेविरोधात दिलेल्या अहवालाशी सहकार सहमत असेल, तर त्यांना सेवेतून काढण्यात येईल.

कवलदरा येथील उड्डाणपुलाखाली अनोळखी प्रेत आढळल्याने खळबळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या