19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeमहाराष्ट्रखोतकरांच्या ताफ्यातील गाड्यांचा समृध्दी महामार्गावर अपघात

खोतकरांच्या ताफ्यातील गाड्यांचा समृध्दी महामार्गावर अपघात

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिंदे गटाकडून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यात येत आहे. दरम्यान दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेले शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर यांच्या ताफ्यामधील ८ ते १० गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दौलताबादजवळ समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला असून या गाड्या मुंबईच्या दिशेने येत होत्या तेव्हा हा अपघात झाला आहे. परवानगी नसताना या गाड्या महामार्गवरून नेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. नेते मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा महामार्ग खुला केल्यानं आता शिंदे गटावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. सर्वसामान्यांसाठी जो महामार्ग बंद आहे त्याच महामार्गावर अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या निघाल्या. अर्जुन खोतकर यांच्यासह इतर नेत्यांच्या गाड्यांच्या ताफा दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे निघाला होता. तेव्हा दौलताबाद येथे या ताफ्यातील गाड्यांचा हा अपघात झाला. या अपघातात काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या