30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रपरमबीर सिंग यांची खातेनिहाय चौकशी

परमबीर सिंग यांची खातेनिहाय चौकशी

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आतापर्यंत ५ जणांची चौकशी झाली आहे. आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही सीबीआय चौकशी होणार असली, तरी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. कारण या अगोदर राज्य सरकारनेही या प्रकरणाच्या खातेनिहाय चौकशीसाठी समिती नेमली आहे. ही समिती येत्या आठवडाभरात आपला अहवाल सादर करेल. त्यामुळे या अहवालातून पुढे काय येऊ शकते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

गृह खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने १ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ संजय पांडे यांना गृह विभागाने चौकशीचे आदेश दिले होते. ही चौकशी प्राथमिक स्वरूपाची असून या चौकशीतून जे समोर येईल, त्यानुसार संबंधितांची खातेनिहाय चौकशी लावली जाऊ शकते आणि वेळ पडल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाईदेखील होऊ शकते. मुळात तसे पाहायला गेले तर मुंबई उच्च न्यायालयाने शंभर कोटी वसुली प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्याआधीच म्हणजे १ एप्रिल या दिवशी राज्य सरकारने एक खातेनिहाय चौकशीचा आदेश काढला होता. या आदेशानुसार विद्यमान मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आणि मुंबई पोलिस दलातील काही वरिष्ठ अधिका-यांंनी सचिन वाझेबाबत एक चौकशी केली होती. या चौकशीच्या आधारे राज्य सरकारने अध्यादेश जारी केले होते.

दोन आठवड्यात अहवाल देण्याचा आदेश
चौकशी अहवालाच्या आधारावर राज्य सरकारने संजय पांडे व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार १ एप्रिलपासून ते पुढील २ आठवड्यापर्यंत ही प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते.

सीबीआय चौकशीआधीच खातेनिहाय चौकशी होणार
आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी होण्याआधीच राज्य सरकारतर्फे करण्यात आलेली शंभर कोटी रुपये वसुली प्रकरणी करण्यात आलेली खातेनिहाय चौकशी यावरून आता माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुन्हा आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळणार आहेत.

राज्यात लॉकडाऊन अटळ?

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या