23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रआघाडीत आरोपांचा भंडारा !

आघाडीत आरोपांचा भंडारा !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.११(प्रतिनिधी) भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष-उपाध्यक्षाच्या निवडणुकीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. गोंदियात राष्ट्रवादीने भाजपला मदत केल्याने संतापलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी जळजळीत टीका केली. तर याला उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्थानिक पातळीवर काहीतरी घडल्याने लगेच टोकाची भूमिका घेणे योग्य नसल्याचे सांगत याबाबत नापसंती व्यक्त केली.

भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसने भाजपाच्या बंडखोर आमदारांना सोबत घेऊन सत्ता काबीज केली. पण गोंदिया जिल्हापरिषदेत मात्र नाना पटोले यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे अनेक पंचायत समित्यांमध्ये संख्याबळ अधिक असूनही काँग्रेसला सत्तेबाहेर राहावे लागले. यामुळे संतप्त झालेल्या नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जळजळीत टीका केली आहे. राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खूपसल्याचे ट्विट तयानी केले आहे. यापेक्षा सामोरून वार करणारा शत्रू परवडतो. दोस्ती करायची असेल तर प्रामाणिकपणाने करावी, ही काँग्रेसची भूमिका आहे. पण राष्ट्रवादीचे तसे नाही. आपण हायकमांडला याची माहिती देणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

टोकाची भूमिका अयोग्य !

वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक पातळीवर काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकते, पण लगेच टोकाची भूमिका घेणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. राज्यात भाजप विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आहेत, पुढेही तिन्ही पक्ष एकत्र राहिले पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. मात्र, गोंदियामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी का एकत्र जाऊ शकले नाहीत? तिथे अशी परिस्थिती का उद्भवली? याची सध्या आम्ही माहिती घेत आहे. प्रफुल्ल पटेल परदेशी गेलेले आहेत. ते परत आल्यानंतर अधिक तपशील घेऊन त्यांच्याशी चर्चा करु, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या