उस्मानाबाद : बेंबळी व वैराग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला बेंबळी पोलीसांनी मंगळवारी दि. २८ जून रोजी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून सोन्याचे दागिने व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
पोलीसांनी सांगितले की, अक्षय बाळू शिंदे रा. सुंबा ता. उस्मानाबाद यासह चार जणांच्या विरोधात बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या पाच जणांनी चिखली येथे चोरी करून सोन्याचे दागिने लंपास केले होते.
तसेच वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल लंपास केली होती. या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
बेंबळी पोलीसांनी आरोपी अक्षय शिंदे याला अटक कून त्याच्या ताब्यातून २१ हजार रुपयेकिंमतीचे सोन्याचे कानातले झुबे व ९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ठुशी, होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल जप्त केली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कल्याण घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली बेंबळी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे, पोलीस उपनिरिक्षक पांडुरंग माने, हवालदार नवनाथ बांगर, रविकांत जगताप, सुनील इगवे, विनायक तांबे, सचिन कोळी यांच्या टिमने केली.