22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रराजगृहाची तोडफोड करणाऱ्या आरोपीला 15 दिवसानंतर अटक

राजगृहाची तोडफोड करणाऱ्या आरोपीला 15 दिवसानंतर अटक

एकमत ऑनलाईन

मुंबई : 7 जुलै रोजी दोन समाजकंटकांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहाची तोडफोड केले होती. या दोघांनी राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या होत्या, त्याचबरोबर घरातील बागेची देखील नासधूस केली होती.

पोलिसांनी या प्रकरणी 15 दिवसानंतर तोडफोड करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. माटुंगा पोलिसांनी विशाल अशोक मोरे उर्फ विठ्ठल काल्या याला अटक केली आहे. त्याला बुधवारी कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून अटक करण्यात आली. राजगृहाबाहेरील परिसरात मोफत जेवण मिळत असल्याने मोरे तेथील समोरच्या फुटपाथवर राहायचा. पण त्याला घटनेच्या आदल्या दिवशी हटकले, त्या रागातून त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

सात जुलैला सायंकाळी घडलेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीसोबत असणाऱ्या उमेश जाधव याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. जाधव हा परेलचा रहिवाशी असून बिगारी काम करतो. जाधवच्या चौकशीतून तोडफोड करणाऱ्याचे नाव काल्या असल्याचे समोर आले. लॉकडाऊन दरम्यान जेवण वाटप होत असताना त्याची काल्यासोबत भेट झाली होती. दोघेही फुटपाथवरच राहायचे. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने काल्यापर्यंत पोहोचले.

Read More  हायकोर्टाचा सकाल : 65 वर्षांवरील कलाकारांना सेटवर काम करण्यास बंदी का?

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या