नवी दिल्ली : न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास अॅटर्नी जनरल के.के.वेणुगोपाल यांनी परवानगी दिली आहे. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना जामीन दिल्याप्रकरणी तनेजा यांनी दोन ट्वीट केले होते.
त्यावरुन न्यायालयाचा अवमान झाल्याची तक्रार विधी शाखेचा विद्यार्थी आदित्य कश्यप यांनी केली होती. रचिता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दोन व्यंगचित्रे रेखाटली होती. तशीच ती सोशल मीडियावर सॅनिटरी पॅनल्स नावाच्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केली होती.
यापूर्वी, अॅटर्नी जरनल के.के. वेणुगोपाल यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरोधातही अर्णव गोस्वामी जामीनप्रकरणी न्यायालयावर टीका केल्याबद्दल कारवाई करण्याची परवानगी दिली होती.