24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रएसटी थांबा न घेणा-यांवर कारवाई होणार

एसटी थांबा न घेणा-यांवर कारवाई होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यभरात शहरांसह शहराबाहेरील उड्डाणपुलांखाली एसटीचे बस थांबे देण्यात येऊनही एसटी पुलांवरून सुसाट निघून जात असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे आता अशा एसटी चालक-वाहकांवर विशेष पथकाद्वारे कारवाई केली जाणार आहे. राज्यभरातील विभाग नियंत्रकांना वाहतूक व्यवस्थापकांकडून तसे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नांदेडसह अनेक भागांतून एसटीच्या मुख्यालयात याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.

एसटी मध्यवर्ती कार्यालयांकडून अनेक वेळा उड्डाणपुलांवरून बस न नेता पुलाखाली असलेल्या थांब्यांवर बस थांबे घेण्याच्या सूचना देण्यात आल्­या आहेत. मात्र तरीही चालक-वाहकांकडून तसेच स्थानक प्रशासन, व्यवस्थापनाकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. बस थांब्यांवर न येता पुलावरून जात असल्याने पुलाखाली थांब्यांवर थांबलेल्या प्रवाशांना एसटीसाठी तासन्तास रेंगाळावे लागते, अखेर नाइलाजास्तव खासगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय स्वीकारावा लागतो.

परिणामी एसटीच्या उत्पन्नालाही फटका बसत आहे. प्रवासी संघटना आणि प्रवाशांकडून याबाबत एसटी मुख्यालयाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे यापुढे आता विशेष पथकाद्वारे तपासणी करून अशा बेजबाबदार कर्मचा-यांवर कारवाई केली जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या