24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रअभिनेता कमाल खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

अभिनेता कमाल खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

एकमत ऑनलाईन

मुंबई : वादग्रस्त ट्विटप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता कमाल खान अर्थात केआरके याला बोरिवली कोर्टानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळं केआरकेच्या अडचणीत वाढ झाली असून त्याला आता तुरुंगात रहावं लागणार आहे.

काही दिवसांपासून केआरकेला अटक होणार अशी चर्चा सुरु होती. तो जेव्हा मुंबई विमानतळावर आला तेव्हा त्याला अटक करण्यात आली. केआरके हा सोशल मीडियावर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतो.

कोण आहे केआरके?
कमाल रशीद खान अर्थात केआरके हा भारतीय अभिनेता, कथा लेखक, निर्माता आहे. त्यानं सन २००९ मध्ये बिगबॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग नोंदवला होता. तेव्हापासून तो प्रकाशझोतात आला. देशद्रोही नावाच्या सिनेमामुळं तो बॉलिवूडमध्ये चर्चेत आला होता. हा सिनेमाची त्यानं निर्मिती देखील केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या