मुंबई – मराठी मनोरंजनसृष्टीतून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रभाकर मोरे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. प्रभाकर मोरेंनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा हात पकडत पक्षात प्रवेश केला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मोरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा कार्यक्रम साजरा झाला. यावेळी प्रभाकर मोरे यांना कोकण विभागाची अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. तसेच चित्रपट सांस्कृतिक विभागाची जबाबदारी दिली आहे, अशी घोषणा खुद्द अजित पवार यांनी केली.
यावेळी बोलताना प्रभाकर मोरेंनी म्हटले, ‘कलाकारांच्या व्यथा मांडण्यासाठी आणि कोकणातील कला संस्कृतीत काही अडचणी आहेत. त्यामध्ये मदत करण्यासाठी, व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून हा प्रवेश केला.
अजित पवार, सुप्रिया सुळे यांचा कलाकारांच्या पाठीशी हात आहे. सर्वसामान्य कलाकारांसाठी काही तरी करण्याची इच्छा आहे. मला चांगले काम करायचे आहे. अजित पवार यांच्या स्वभावामुळे मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे. रमीची जाहिरात मी करणार नाही, इतरांनाही सुद्धा अशा जाहिराती करू नयेत असे माझे सांगणे आहे.