24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रउद्यापासून आदित्य ठाकरेंची 'निष्ठा यात्रा'

उद्यापासून आदित्य ठाकरेंची ‘निष्ठा यात्रा’

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या मुंबईतील २३६ शाखांमध्ये जाऊन कार्यकर्ते, शाखाप्रमुख, गटप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. सोबतच राज्यभरातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात देखील ते जाणार आहेत. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या या निष्ठा दौऱ्यामुळे शिवसेनाला लागलेली गळती थांबणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदेंसोबत आधी गुजरात तर त्यानंतर गुवाहाटी गाठले होते. त्यानंतर अखेर राज्यातील महाविकास आघाडी सरकर देखील कोसळले, यानंतर देखील शिवसेनेला लागलेली गळती थांबलेली नाही आहे. अनेक स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटाकडे जात आहेत. ही गळती थांबवण्यासाठी आदित्य ठाकरे आता मैदानत उतरले आहेत.

बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या भायखळा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला सुरूवात होणार आहेत, या यात्रादरम्यान ठाकरे हे शिवसेनेत उरलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. फक्त मुंबईतच नाही तर त्यांची ही यात्रा राज्यभरातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात देखील जाणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या