28.9 C
Latur
Monday, January 18, 2021
Home महाराष्ट्र ‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

एकमत ऑनलाईन

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार ३५३ प्रवेशाच्या जागा रिक्­त आहेत. कोरोनामुळे यंदा ‘आरटीई’ प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हावेत यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून सतत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ शनिवारी संपली.

आता आणखी मुदतवाढ मिळणार का असा प्रश्­नही पालकांकडून उपस्थित होत आहे. ९ हजार ३३१ शाळांमध्ये १ लाख १५ हजार ४७७ प्रवेशाच्या जागा आहेत. यासाठी २ लाख ९१ हजार ३६८ आॅनलाइन अर्ज आले. एकूण १ लाख ३३ हजार ९५० मुलांची निवड झाली. त्यात ६९ हजार ६९९ मुलांचे तात्पुरते प्रवेश झाले.
नियमित प्रवेश फेरीतून १ लाख ९२६ मुलांची निवड झाली. त्यातील ६८ हजार २३० मुलांचे प्रवेश निश्­चित झाले. प्रतिक्षा यादीतील ३३ हजार मुलांना संधी उपलब्ध झाली. मात्र, प्रत्यक्षात १४ हजार ८९४ जणांनी प्रवेश घेतला.

पुणे जिल्ह्यातील ९७२ शाळांमध्ये १६ हजार ९५० प्रवेशाच्या जागा दर्शवल्या होत्या. यासाठी ६२ हजार ९१९ मुलांचे अर्ज दाखल झाले होते. नियमित प्रवेश फेरीतील १६ हजार ६१७ मुलांपैकी ११ हजार १४३ जणांकडून प्रवेश घेण्यात आला. प्रतिक्षा यादीतील ६ हजार ४२३ मुलांपैकी ३ हजार १४७ जणांनीच प्रत्यक्षात प्रवेश नोंदविला.

बंडखोरी बोराळकर यांच्या मुळावर तर चव्हाणांच्या पथ्यावर ?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या