22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्रशाळा सोडल्याचा दाखला नसला तरी जन्म प्रमाणपत्रावर दुसऱ्या शाळेत प्रवेश

शाळा सोडल्याचा दाखला नसला तरी जन्म प्रमाणपत्रावर दुसऱ्या शाळेत प्रवेश

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१७ (प्रतिनिधी) फी किंवा अन्य कारणांमुळे काही शाळा विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (टीसी/एलसी) देत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला नसला तरी जन्म प्रमाणपत्राच्या आधारे दुसऱ्या शाळेत प्रवेश दिला जावा असे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे. त्यामुळे पाल्यांचे शालेय शुल्क भरता आलेले नाही किंवा यापुढे त्यांना महागड्या खाजगी शाळांमध्ये पाल्यांना ठेवायची इच्छा नाहीय. परंतु आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या किंवा अन्य कारणासाठी शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यास काही शाळा नकार देत आहेत. किंवा ठराविक रक्कम भरली तरच दाखला देऊ अशीही अडवणूक सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. प्रत्येक मुलाला शिकण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. परंतु शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळांत प्रवेश नाकारला जात आहे. शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे अन्यायकारक, तसेच शिक्षण अधिकार कायद्याची पायमल्ली करणारे आहे. त्यामुळे सरकारने जन्म प्रमाणपत्राच्या आधारावर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा टीसी वेळेत मिळत नसेल किंवा नाकारला असेल अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देऊन तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी. शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंत अशी तरतूद आहे. हा नियम आता नववी-दहावीच्या प्रवेशासाठी सुद्धा लागू करण्यात आला आहे. पूर्वीच्या शाळेकडून LC/TC प्राप्त न झाल्यास प्रवेशित होणाऱ्या शाळेत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश द्यावा. यासाठी विद्यार्थ्यांचे जन्माचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरावे, असं या निर्णयात म्हटलं आहे. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक / शाळाप्रमुख यांच्याविरुद्ध नियमातील व कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 

मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या