26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात ३१ तासांनंतर मिरवणुकीची सांगता

पुण्यात ३१ तासांनंतर मिरवणुकीची सांगता

एकमत ऑनलाईन

पुणे : यंदा पुण्यात गणपती मिरवणूक चर्चेचा विषय ठरली. दोन वर्षांनी मोठ्या उत्साहाने पुणेकरांनी गणेशोत्सव साजरा केला. अनंत चतुर्दशीला सुरू झालेली विसर्जन मिरवणूक थेट ३१ तासांनंतर संपली. ३१ तास झाल्यानंतरही मिरवणुका संपल्या नव्हत्या. शहरात नागरिकांच्या मोठ्या रांगा होत्या. काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी १० वाजता मिरवणुकीचा नारळ फोडण्यात आला होता. त्यानंतर ३१ तास ५० मिनिटांनंतर म्हणजेच ७:२० वाजता पुण्यातील शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाले.

विसर्जनादरम्यान राज्यात २० जणांचा मृत्यू
राज्यात गणपती विसर्जनादरम्यान एकूण २० जणांचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. विसर्जनादरम्यान १४ जणांचा बुडून मृत्यू झाला, तर ४ जण रस्ता अपघातात ठार झाले. तसेच झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या