24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रदिल्ली, पंजाबनंतर आता ‘आप’चे लक्ष्य मुंबई

दिल्ली, पंजाबनंतर आता ‘आप’चे लक्ष्य मुंबई

एकमत ऑनलाईन

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले शहर म्हणजे मुंबई शहर. या मुंबई शहरात आगामी काळात महापालिकेची निवडणूक आहे. महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावतो. त्यात शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात संघर्ष सुरू असताना मुंबईकरांना नवा पर्याय देण्याच्या जोरदार हालचाली आम आदमी पक्षाने सुरू केल्या आहेत. दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता काबिज केल्यानंतर मुंबईत पक्षाचा विस्तार करून मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ‘आप’ने डाव आखला आहे.

दिल्ली, पंजाब याठिकाणी ‘आप’ने करिष्मा दाखवत सत्ता स्थापन केली. मात्र काही राज्यांत ‘आप’ला अपयश आले. गेल्या २०१९ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत आप स्वबळावर लढला होता. मात्र त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. आता होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांवर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप करू लागले आहेत. हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तसेच राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस आणि इतर पक्ष देखील आपल्या राजकारणात व्यस्त असताना अशा राजकीय गदारोळात ‘आप’ने आपली स्पेस निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

मुंबईकरांच्या समस्यांकडे लक्ष देणार : आप
‘आप’चे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले की, गेल्या दोन-सव्वा दोन वर्षांपासून मुंबई महापालिकेची तयारी आम्ही करत आहोत. पंजाबमधील विजयामागचे रहस्य म्हणजे दिल्लीत केलेले काम. पाणी, वीज आरोग्य, शिक्षण, सुरक्षित प्रशासन, महिला सबलीकरण या विषयांवर लक्ष देऊन आम्हाला दिल्ली, पंजाबमध्ये लोकांनी निवडून दिले. आम्ही दिल्ली आणि पंजाबच्या विकासाचे पॅटर्न मुंबईत राबवतोय.जनतेची कामे करण्याचा प्रयत्न आप प्रामाणिकपणे करतोय त्यामुळे मुंबईत आम्हाला यश मिळेल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या