26.5 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home महाराष्ट्र संभाजीनगर नंतर आता धाराशिव..!

संभाजीनगर नंतर आता धाराशिव..!

मुख्यमंत्री कार्यालयाकडून उस्‍मानाबादचा धाराशिव असा उल्‍लेख

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१३ (प्रतिनिधी) औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा वाद शांत होत नाही तोवर मुख्यमंत्री कार्यालयाने आणखी एका गावाचे नामांतर केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत टवीटर हँडलवर उस्‍मानाबादचा धाराशिव असा उल्‍लेख करण्यात आला आहे.राज्‍यमंत्रीमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना धाराशिव उस्‍मानाबाद येथे नवीन शासकीय वैदयकिय महाविदयालय निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.काँग्रेसने याआधीच शहरांच्या नामांतराला विरोध केला आहे.मात्र मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आपण औरंगाबादचे संभाजीनगर व उस्‍मानाबादचे धाराशिव या नामकरणावर ठामच असल्‍याचे स्‍पष्‍ट संकेत दिले आहेत.

गेल्‍याच राज्‍यमंत्रीमंडळाच्या बैठकीच्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या टवीटर हँडलवर औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्‍लेख करण्यात आला होता.त्‍यावरून महाविकास आघाडीत वादळ उठले होते.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या अशा प्रकारे शहरांच्या नामांतराला विरोध असल्‍याचे स्‍पष्‍ट केले होते.छत्रपती संभाजी महाराज हे आमचेही आराध्य दैवतच आहेत.पण नामांतराने कोणत्‍या शहरांचे प्रश्न सुटतात का? सामान्य माणसाच्या,गोरगरिबांच्या समस्‍या सुटतात का? असा सवाल केला होता.बाळासाहेब थोरात तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अशा प्रकारचे विषय हे आघाडीच्या नेत्‍यांच्या बैठकीतच सोडविण्यात येतील असे स्‍पष्‍ट केले होते.

मुख्यमंत्री उदधव ठाकरे मात्र या विषयावर ठाम आहेत.त्‍यांनी संभाजीनगरच्या मुददयावरही भूमिका स्‍पष्‍ट करताना म्‍हटले होते,आघाडीच्या जाहीरनाम्‍यात सेक्‍युलर हा शब्‍द आहे.औरंगजेब काही सेक्‍युलर नव्हता.त्‍यामुळे प्रश्नच निर्माण होत नाही.तसेच संभाजीनगर असा उल्‍लेख शिवसेना वर्षानुवर्षे करते.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच ती सुरूवात केली होती.आता देखील राज्‍यमंत्रीमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना उस्‍मानाबादचा उल्‍लेख धाराशिव असा करण्यात आला आहे.त्‍यामुळे आघाडीत पुन्हा एकदा खटका उडण्याची चिन्हे आहेत.

उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांचे रुग्णालय होणार !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या