34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमहाराष्ट्रसंजय राठोडांनंतर धनंजय मुंडे भाजपच्या रडारवर

संजय राठोडांनंतर धनंजय मुंडे भाजपच्या रडारवर

एकमत ऑनलाईन

मुंबई : पुजा चव्हाण हत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला. विरोधी पक्ष भाजपला सरकारमधील मोठ्या नेत्याला टिपता आल्याने त्यांचा हुरुप वाढल्याचे दिसत आहे. राठोड यांच्याप्रमाणे शर्मा भगिनींनी केलेल्या आरोपांवरुन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीच भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

संजय राठोड यांनी स्वत:हून राजीनामा दिला की त्यांचा राजीनामा घेतला गेला यात आम्हाला पडायचे नसून राठोड आता मंत्रिपदावर नाहीत ही महत्त्वाची बाब आहे. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे व्हावी अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष ठेवावे, ही अपेक्षा असल्याचेही पंकजा यांनी नमूद केले.

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांनी जसा राजीनामा दिला तसाच करुणा शर्मा आणि रेणू शर्मा प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी पंकजा यांनी केली. धनंजय मुंडे राजीनामा देत नसतील तर त्यांच्या पक्षाने त्याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहनही पंकजा यांनी केले. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी आमचा पक्ष सातत्याने करत असून माझेही तेच मत असल्याचेही पंकजा एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाल्या.

नेत्यांवरील गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी
पोलिस यंत्रणांवरील दबावाकडे बोट दाखवत पंकजा यांनी यावेळी महत्त्वाची मागणी केली. राजकारणात वावरत असलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल असल्यास त्याची चौकशी करण्यासाठी वेगळी यंत्रणा असायला हवी. तशी स्पष्ट गरज सध्या दिसत आहे, असेही पंकजा यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप गोपनीय धोरण; सुनावणी १५ मार्चला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या