27 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home महाराष्ट्र तक्रार केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांचा घेतला समाचार

तक्रार केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांचा घेतला समाचार

एकमत ऑनलाईन

पुणे : ग्रामीण भागात आजही गंभीर रुग्णांना उपचार मिळत नाहीत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत. उपचार मिळत नसल्याने ग्रामीण भागातील मृत्यूदर देखील वाढला आहे. लोकप्रतिनिधी यांनी तक्रार केल्यानंतर पवार यांनी अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालयांना शासनाने व्हेंटिलेटर दिले, पण दोन महिने झाले अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर सुरूच नाही.

यामुळेच गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने निष्कारण बळी जात असल्याची तक्रार जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्यासह मंत्री दत्तात्रय भरणे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, आमदार अशोक पवार, सुनील शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर व्हेंटिलेटर सुरू करण्यास काय अडचण आहे ? असा सवाल जिल्हा सिव्हील सर्जन अशोक नांदापूरकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारला. परंतू पवार बोलत असताना देखील नांदापूरकर फोनवर बोलण्यात व्यस्त होते. यामुळे पवार चांगलेच चिडले, तुम्हाला लाज वाटत नाही का, ग्रामीण भागाचा दौरा करून तातडीने व्हेंटिलेटर सुरू करण्याचे आदेश पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवार (दि.18) रोजी ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा विधानभवन येथे बैठक झाली. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (व्हिसीद्वारे), जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अशोक पवार, आमदार सुनिल शेळके, आमदार राहुल कुल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे, यांच्यासह विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त तथा ससून रुग्णालयाचे समन्वय अधिकारी एस. चोक्कलिंगम, पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

ग्रामीण भागात आजही गंभीर रुग्णांना उपचार मिळत नाहीत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने रुग्णांचे मृत्यू होत असल्याचे तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या. उपचार मिळत नसल्याने ग्रामीण भागातील मृत्यूदर देखील वाढला आहे. लोकप्रतिनिधी यांनी तक्रार केल्यानंतर पवार यांनी अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.

अजित पवार म्हणाले, शहरी भागासह ग्रामीण भागातील ‘कोरोना’चा रुग्णदर व मृत्यूदर कमी होणे गरजेचे असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन पुरेसा निधी उपलब्ध करुन देईल. रुग्णांना वेळेत ऑक्सिजनयुक्त खाटा व योग्य उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने काम करावे. ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच भागात उपचार मिळवून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत. येथील ऑक्सिजनयुक्त बेड व अन्य सोयी सुविधांसाठीची अपुरी कामे आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीने पूर्ण करुन घ्यावीत, अशी सूचना करुन नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयांसाठी विशेष बाब म्हणून तात्काळ पदनिर्मिती करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

अकलुज प्रांतधिकारी कार्यालय येथे माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघ व अकलुज शहर पत्रकार संघ यांच्या वतीने विविध मागण्यासाठी निदर्शने

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या