30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeमहाराष्ट्रतलवार कोणाविरुद्ध उपसणार ? विजय वडेट्टीवार यांचा खासदार संभाजीराजेंना सवाल

तलवार कोणाविरुद्ध उपसणार ? विजय वडेट्टीवार यांचा खासदार संभाजीराजेंना सवाल

एकमत ऑनलाईन

मुंबई : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिस-या पर्वाला शुक्रवारी तुळजापुरातून सुरुवात झाली. मोर्चात खासदार संभाजी राजे यांनी आम्हाला ग्रा धरु नका. मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी आम्ही तलवार उपसू असे म्हटले होते. आता राज्यात त्यावरुन प्रतिक्रिया उमटत आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत राजांना तलवार कोणाविरुद्ध उपसणार? असा सवाल केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, राजा रयतेचा असतो, समाजाचा नाही. तलवार उपसण्याची भाषा का? तलवार कोणाविरुद्ध उपसणार ? ओबीसींविरोधात की दलितांविरोधात? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर बारा बलुतेदार होते. मोरे, जावळे विरोधात होते. बहुजनांसाठी आरक्षण देणा-या राजांचे वारसदार वेगळी भाषा बोलतात. राजाची भुमिका जनतेची हवी. केवळ एका समाजासाठी तलवार काढण्याची भाषा योग्य नव्हे, असे वडेट्टीवार म्हणाले.

एमपीएससी परीक्षेबाबतही त्यांनी मत मांडले. एमपीएससी परीक्षेत २०० पदे आहेत. त्यात मराठा समाजासाठी २३ जागा आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. वय, जात, लग्नाचे प्रश्न असतात. परीक्षा पुढे ढकलली तर त्यांचे नुकसान होणार आहे. मराठा समाजातील मुलांचे नुकसान होऊ नये याचाही विचार करावा, माझ्यामते परीक्षा व्हावी,असे मत वडेट्टीवार यांनी मांडले.

गोळ्या झाडल्यानंतर दगडाने ठेचून गुंडाचा खून; सांगलीत खळबळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या