35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home महाराष्ट्र कृषी कायदे रद्द होणार नाहीत

कृषी कायदे रद्द होणार नाहीत

एकमत ऑनलाईन

मुंबई: शेतकरी आंदोलनांची केंद्र सरकारने दखल न घेतल्यास हे आंदोलन केवळ दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काहीही झाले तरी हे कायदे रद्द होणार नाहीत, असे प्रत्युत्तर दिले आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकºयांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. दिल्लीच्या सीमेवर हजारो संख्येने शेतकरी दाखल झाले आहेत. यावरून शरद पवारांनी केंद्र सरकारला फटकारले आहे. ‘शेती आणि अन्न पुरवठा या बाबतीत पंजाब व हरयाणातील शेतकºयांचे योगदान अधिक आहे. गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनात, तर सगळयाच देशाची गरज या शेतकºयांनी भागवली. भारत जगातील १६ ते १८ देशांना धान्य पुरवठा करतो, त्यात पंजाब आणि हरियाणातील शेतकºयांचा वाटा फार मोठा आहे. याची केंद्र सरकारने दखल घ्यायला हवी होती. पण ती घेतलेली दिसत नाही,’ अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली होती.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकºयांना डोळयासमोर ठेवून हा कायदा तयार केला आहे. कायद्याचा फायदा सर्व शेतकºयांना होणार आहे. त्यामुळे काहीही झाले तरीही कायदा रद्द होणार नाही, कायद्यात बदल केले जातील, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
कायद्यात मोठा बदल नाही

केंद्राने केलेल्या कायद्यात कोणताही बदल केलेला नाही. जे जुन्या कायद्यात होते, तेच कायम आहे. फक्त या कायद्याने शेतकºयांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली आहे. प्रश्न फक्त एमएसपीचा होता. केंद्र सरकार लिखित स्वरुपात एमएसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आंदोलने आणि भारत बंद करणे याला काही अर्थ नाही, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नसल्याचा पुनुरुच्चार केला.

नरभक्षक बिबटयाला गोळया घालण्याची वनविभागाने मागितली परवानगी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या