24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रविरोधकांच्या धास्तीने कृषीमंत्री बांधावर

विरोधकांच्या धास्तीने कृषीमंत्री बांधावर

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात विरोधकांनी अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे झालेले नुकसान आणि त्यांना देण्यात आलेली तुटपुंजी मदत यावरून सरकारला घेरले आहे. दरम्यान, कृषिमंत्री अब्दुल सत्तार अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी तीन दिवसीय विदर्भ दौ-यावर आहेत.

विदर्भात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या जमिनी उद्धवस्त झाल्या. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मी विदर्भ दौ-यावर आलो आहे, अशी माहिती मंत्री सत्तार यांनी दिली आहे. नागपूर विभागीय कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मी शरद पवारांची भेट घेणार आहे. शेती बाबत चर्चा करण्यासाठी सत्तारांनी पवारांची वेळ मागितली आहे. तसेच पूरग्रस्त शेतीचा तीन दिवसाचा दौरा केल्यानंतर राज्यपालांनाही अहवाल घेऊन सोमवारी भेटणार असून मदती संदर्भातली घोषणा अधिवेशनात करणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या ठिकाणी बैठकांचे आयोजन
जिल्ह्याच्या ठिकाणी बैठका घेऊन बांधावर जाऊन शेतक-यांशी चर्चा करा. त्यांना धीर द्या. सरकार तुमच्या पाठीशी असल्याची हमी द्या. नुकसानीचे पंचनामे करताना पक्षपात होऊ देऊ नका. कोणताही शेतकरी सुटणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे.

एकदिवस बांधावर जाऊन राहणार
पत्रकार परिषदेत बोलताना, कृषी विभागाचे आणि महसूल विभागाचे कलेक्टर, कमिशनर हे दोन्ही अधिकारी एक दिवस एका गावात जाऊन शेतक-यांची दिनचर्या समजून घेतली. शेतकरी किती घाम गाळतो किती रक्त जाळतो. तो निंदन करेल तर आम्ही पण ते निंदन शिकू. हे सर्व आम्ही एक दिवस सोबत राहून शिकू महाराष्ट्रात पहिल्यांदा असे घडेल की कृषिमंत्री एक दिवस त्या बांधावर जाऊन राहील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या