मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाण्यात येऊन लढण्याची भाषा करणारे माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना त्यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातच हादरा देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरु असल्याचे समजते.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंगळवारी याबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले. वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे आ. सचिन अहिर आणि सुनील शिंदे हे शिंदे गटात प्रवेश करू शकतात, असे सिरसाट म्हणाले.