25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या मदतीला हवाई दल सरसावले

महाराष्ट्राच्या मदतीला हवाई दल सरसावले

एकमत ऑनलाईन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. यावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा सामना करताना, काय समस्या, अडचणी आहेत, त्याची पंतप्रधानांना माहिती दिली. मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांसोबत काय संवाद झाला? त्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुपारी माहिती दिली.

पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेमध्ये ऑक्सिजन संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्राला ऑक्सिजनचा साठा लवकरात लवकर मिळावा, यासाठी इंडियन एअर फोर्स मदत करणार आहे. महाराष्ट्राला अन्य राज्यांकडून ऑक्सिजन मिळत असला, तरी तो ऑक्सिजन पोहोचायला विलंब लागत असल्याच्या मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितला. विशाखापट्टणमहून ऑक्सिजन घेऊन ट्रेन निघालीय, पण या ट्रेनला पोहोचायला उशिर होत आहे़ महाराष्ट्रात ऑक्सिजन एअर लिफ्टींगने पोहोचवता येईल का? अशी विचारणा केली. त्यावर पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे राजेश टोपेंनी सांगितले.

आपल्या ऑक्सिजन आणण्यासाठी ज्या राज्यातून कोटा मिळाला आहे, तिथे एअर फोर्सच्या मालवाहतूक विमानांमधून रिकामे टँकर्स पाठवले जातील. त्या टँकर्समध्ये ऑक्सिजन भरल्यानंतर रेल्वे मार्गाने किंवा जवळचे ठिकाणे असेल, तर रस्ते मार्गाने ऑक्सिजन महाराष्ट्रात येईल असे टोपे यांनी सांगितले. ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात ऑक्सिजन निर्मात्यांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे राजेश टोपे म्हणाले.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा; शरद पवारांचे १९० साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीचे आदेश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या