22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रअजय नवंदरला अटक

अजय नवंदरला अटक

एकमत ऑनलाईन

मुंबई : डीएचएफएल केस प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली असून अजय नवंदरला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. अजय नवंदर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. डीएचएफएल घोटाळ्याचे पैसे अजय नवंदरने दाऊद, छोटा शकील यांना दिल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.

डीएचएफएल केस प्रकरणातील ही मोठी कारवाई असून या प्रकरणी सीबीआयला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डीएचएफएलने १७ बँकांकडून पैसा उचलून मोठा घोटाळा केला होता, हा पैसा अजय नवंदरने हवालाच्या माध्यमातून भारताबाहेर पाठवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. हा पैसा दाऊद आणि छोटा शकील यांच्यापर्यंत पोहचून या पैशाचा वापर भारतविरोधी कारवाईमध्ये वापरल्याचा संशयही सीबीआयला आहे. अजय नवंदर याच्या अटकेनंतर या प्रकरणात अंडरवर्ल्ड आणि राजकीय कनेक्शन काय आहे याचा तपास सीबीआय करीत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या