36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रअजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात बैठकीदरम्यान मोठा वाद

अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात बैठकीदरम्यान मोठा वाद

एकमत ऑनलाईन

अमरावती : विभागातील वार्षिक नियोजनाच्या बैठकीदरम्यान निधीच्या मागणीवरून राज्यमंत्री बच्चू कडू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. अजित पवार यांनी अकोला जिल्ह्यासाठी थोडा निधी वाढवून दिल्यामुळे वाद संपुष्टात आला असला तरी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मिळालेल्या निधीवरून नाराजी व्यक्त केली आहे.

अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाची बैठक सोमवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यासाठी ३०० कोटीची तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे यवतमाळ ३२५ कोटी, बुलढाणा २९५, वाशिम १८५ तर अकोलासाठी १८५ कोटीचा निधी देण्यात आला. मात्र या निधीवर अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. मी सरकार मध्ये आहे त्यामुळे बोलू शकत नाही. विदर्भाचा अनुशेष भरून निघावा याकरिता आपण अधिक निधीची मागणी केली होती, मात्र निधी वाढून देण्यात आला नाही, पण निधी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

विभागातील पाचही जिल्ह्यांना तरतुदीपेक्षा वाढीव निधी देण्यात आल्याचे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अकोला जिल्ह्यासाठी १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, ती १८५ कोटी रुपये करण्यात आली आहे, याशिवाय अमरावतीची तरतूद २८५ वरून ३०० कोटी, यवतमाळसाठी ३१० वरून ३२५, बुलढाणा जिल्ह्यासाठी २८५ वरून २९५ तर वाशिम जिल्ह्यासाठी तरतूद १४० कोटी रुपयांवरून १८५ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. वाशिम जिल्हा हा आकांक्षित (मागास) जिल्ह्यात मोडत असल्याने वाढीव निधी देण्यात आल्याचे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यांनी मात्र निधीच्या वाटपाबाबत कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे संकेत दिले.

व्हिसा दिलासा!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या