24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रअजित पवार यांचे सूचक संकेत

अजित पवार यांचे सूचक संकेत

एकमत ऑनलाईन

अवघा महाराष्ट्र बघेल, चमत्कार कुणाबाबत घडतोय

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीस अवघे दोन दिवस शिल्लक असून, २० जून रोजी मतदान आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारपरिषद घेत, महाविकास आघाडीच्या तयारीबाबत माहिती दिली.

तसेच, चमत्कार कुणाच्याबाबत घडतोय हे उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल, असे विधानही यावेळी त्यांनी केले. महाविकास आघाडीचे सर्व सहा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवले.

उपमुख्यंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘विधानपरिषद निवडणूक लागली आहे, ११ उमेदवार उभे आहेत. साधारण चार पक्षाचे उमदेवार निवडणुकीसाठी उभे आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सहा उमेदवार उभे केलेले आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत.

मागील दोन दिवस मी विविध बातम्या पाहतोय, मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की आम्ही सगळेजण हे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करतोय. एक गोष्ट खरी आहे की शिवसेनेकडे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी मते आहेत. आमच्या दोन सदस्यांना अजूनही मतदान करण्याची परवानगी न्यायालयाने न दिल्याने आमची संख्या ही ५१ आहे. कोटा साधारण २६ चा आहे.

अगदी काठावर धरून चालत नाही, कारण राज्यसभा निवडणुकीत काय घडले हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे. त्यामुळे यदाकदाचित एखादे मत दिलेले बाद झाले, काही तिथे अडचण आली, सभागृहात मतदान करत असताना कधी काय होईल सांगता येत नाही. कधी नजरचुकीने देखील एखादी गोष्ट घडून जाते आणि त्याची किंमत शेवटी मोजावी लागते. जसे मागील वेळेस एका शिवसेनेच्या सदस्यांस आमदार म्हणून दिलेले मत हे बाद ठरवण्यात आले. म्हणून आम्ही सगळेजण काळजी घेतोय, कोटा जास्त कसा देता येईल याबद्दलचा प्रयत्न करतोय.’’

तसेच, ‘‘चमत्कार होईल की आणखी काय होईल ते सगळे दिसेलच. ११ पैकी १० निवडून येणार आहेत एक जण पराभूत होणार आहे, त्यामुळे तो चमत्कार तर घडणारच आहे. आता चमत्कार कुणाच्या बाबतीत घडतोय ते उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल. सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते आहे.’’ असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलून दाखवले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या