36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना अजित पवार यांचे अभिवादन !

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना अजित पवार यांचे अभिवादन !

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.२५ (प्रतिनिधी) – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी शहिद झालेल्या मुंबई पोलिस, एनएसजी, गृहरक्षक तसंच अन्य सुरक्षा दलातील अधिकारी व वीर जवानांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आदरांजली वाहिली. या हल्ल्यावेळी प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांनाही उपमुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या.

मुंबईवरील दहशतवादी हल्यातील शहिद वीरांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुंबईवरील हल्ल्यावेळी मुंबई पोलिस व सुरक्षा दलांनी केलेला दहशतवाद्यांचा मुकाबला हा गौरवशाली इतिहास आहे. त्या हल्ल्यावेळी मुंबईच्या रक्षणासाठी पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी, जवान स्वयंप्रेरणेने रस्त्यावर उतरला. प्राणांची पर्वा न करता कर्तव्यनिष्ठेने दहशतवाद्यांचा मुकाबला केला. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या वीराने शरीरावर गोळ्या झेलून अजमल कसाबसारखा आत्मघातकी पथकातील दहशतवादी जिवंत पकडून दिला. मुंबई पोलिसांच्या या पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही. मुंबई पोलिसांनी देशाच्या रक्षणासाठी बजावलेलं कर्तव्य, केलेला सर्वोच्च त्याग देशवासियांच्या कायम स्मरणात राहील. मुंबई पोलिसांचं हौतात्म्य सर्वांना देशसेवेची, कर्तव्याची जाणीव करुन देईल. नागरिकांच्या मनातील पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ करील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबई पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून लढताना भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय सुरक्षा दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, भारतीय रेल्वे, आरोग्य सेवेचे डॉक्टर-कर्मचारी, रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी, हॉटेल ताज व ट्रायडंट हॉटेलचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिकांनीही एकजुटता, देशभक्ती, साहस, मानवतेचे अलौकिक दर्शन घडवले. या सर्वांच्या त्याग, कर्तव्यनिष्ठेबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

दहशतवादी हल्यातील शहिद पोलिस वीरांना श्रद्धांजली वाहत असताना मुंबई पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी बांधवांनी शहरासाठी सातत्याने केलेला त्याग तसंच ‘कोरोना’ संकटकाळात बजावलेल्या कामगिरीचंही उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं आहे. ‘कोरोना’शी लढताना प्राण गमावलेल्या पोलिस बांधवांनाही त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिद वीरांना श्रद्धांजली वाहत असताना यापुढच्या काळात शहराचं पोलिस दल आधुनिक शस्त्रास्त्र, संपर्क यंत्रणा तसंच शारिरिक व मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम असेल. मुंबई पोलिसांचं मनोबल सदैव उंच राहील. जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस दल ही प्रतिमा अधिक ठळक होईल, यासाठी शासन व नागरिकांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू होणार !

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या